आदगाव येथे तरुणाची आत्महत्या

| दिघी | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कुणबीवाडी येथील निलेश बांद्रे (36) तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे 5 वाजता घडली आहे. लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून हे कृत्य त्याने केल्याचे पोलिसांकडून समजले. दिघी सागरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी होडीवर जातो असे सांगून निलेश घराबाहेर पडला. मात्र, त्याने होडीवर न जाता आदगाव येथील जंगलात वडाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने फास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सहा पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी भेट दिली.

Exit mobile version