सुलोचना शिंदे यांचे निधन

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील शिरवली गावच्या रहिवाशी असणार्‍या सुलोचना नंदू शिंदे यांचे शुक्रवारी दि.27 सप्टेंबर रोजी निधन झाले. निधनासमयी त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सुलोचना यांचे दशक्रियाविधी व अंतिम धार्मिकविधी रविवारी (दि.6) शिरवली येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version