| रसायनी | वार्ताहर |
सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीराम कांबळे यांच्या पत्नी सुमन बळीराम कांबळे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अंत्यविधीसाठी मोठी गर्दी जमली. त्या सन 1984 मध्ये सावळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सावळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांचा पुण्यानुमोदन व श्रध्दांजली सभा रविवार, दि. 6 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. सावळे येथे आयोजित केली आहे.