सुमित ठाकूर एनसीसी बेस्ट कॅडेट

। पेझारी । वार्ताहर ।
6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी मुंबई ग्रुप तर्फे सन 2020-21या शैक्षणिक वर्षातील बेस्ट एनसीसी कॅडेट म्हणून को.ए.सो. ना.ना पाटील हायस्कूल पोयनाडचा विद्यार्थी सुमित महेंद्र ठाकूर यांची निवड करण्यात आली.

गेल्या वर्षभरामध्ये एन.सी.सी.पथकामार्फत ज्या क्टिविटी राबविल्या गेल्या त्या ऍक्टिव्हिटीज मधून महाराष्ट्र बटालियनचे उ.ज.कर्नल मनिष अवस्थी,ज.कर्नल डिसिल्वा यांनी सुमित ठाकूर याने वर्षभरातील केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्याला बेस्ट कँडिडेट म्हणून घोषित केले. 3500 रुपयाचा धनादेश देऊन शाळेचे मुख्याध्यापक डी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते सुमित यास गौरविण्यात आले. शाळेतील एनसीसी पथकाचे ऑफिसर समाधान भंडारे यांनी विविध उपक्रम राबवून या विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले.त्याबद्दल सुमित व मार्गदर्शक भंडारे यांचे शाळेतर्फे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बटालियनचे ऑफिसर अवस्थी, कर्नल डिसिल्वा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी सत्र प्रमुख विकास पाटील, शाळेतील शिक्षक शिक्षिका व एनसीसी पथकातील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version