बुद्धिबळ खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत तालुका क्रीडा संकुल पेण येथे दिनांक 3 ते 10 मे 2022 बुद्धिबळ खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. बुद्धिबळ प्रशिक्षक, राज्यस्तरीय पंच, रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना चेस इन स्कूल सचिव विलास एकनाथ म्हात्रे यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावेळी तीस तासांचे प्रशिक्षण नियम व नियमांसह मूलभूत ज्ञान, चार तास प्रति दिवस सकाळचे दोन व संध्याकाळचे दोन तासांचे सत्र होणार आहे. तरी सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना द्यावी. जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी बुद्धिबळ क्रीडा प्रशिक्षक विलास म्हात्रे 8888011411 तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर 9158035276 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version