। पोयनाड । प्रतिनिधी ।
पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमी यांनी रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्सच्या क्रीडांगणावर युवा क्रिकेटपटूंसाठी तीनदिवसीय क्रिकेटचे प्रशिक्षण शिबिर व नंतर दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण व क्षेत्ररक्षणांचे तंत्रशुद्ध पद्धतीने तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. खेळाडूंनी दररोज आपले शारीरिक फिटनेस कसा राखावा ह्याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरानंतर दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंचे क्रिकेट कौशल्य वाढवुन पुढे जिल्हा व राज्यस्तरीय पातळीवर त्यांची निवड व्हावी. हे ह्या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य उद्धिष्ट होते. शिबिरासाठी मुख्य तज्ञ प्रशिक्षक म्हणून सागर कांबळे, अर्षद पेंढारी, सागर मुळे, प्रवीण जगदाळे, विकास पवार, सुशांत पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.