| मुंबई | प्रतिनिधी |
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय मंगळवारी जारी करण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय चर्चा सुरू होती.
पुणे हा औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा मानला जातो, तर बीड दुष्काळग्रस्त आणि विकासाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून, पुणे आणि बीडमधील राजकीय व प्रशासकीय हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







