| म्हसळा | प्रतिनिधी |
कुंभार समाज सामाजिक संस्था रायगडचा 4 था वर्धापन दिन माणगाव तालुका कुणबी समाज भवन येथे रविवारी (दि.5) पार पडला. कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष सतिश दरेकर यांच्या हस्ते झाले. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील समाज बांधवाना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक, जि. पं. सदस्य, तालुका वाईज जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, मारणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले. जीवन गौरव पूरस्कारात म्हसळा येथील म्हसळा कुंभार समाज माजी अध्यक्ष तथा संत गोरा कुंभार नवरात्रोत्सव व सांस्कृतिक क्रीडा मंडळ अध्यक्ष सुनिल अंजर्लेकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास रायगड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, ज्ञाती बांधव, हितचिंतक आणि मान्यवर उपस्थित होते.
सुनिल अंजर्लेकर यांनी गेल्या 25 वर्षात श्रीवर्धन -म्हसळा कुंभार समाज उन्नती मंडळाचे खजिनदार आणि सल्लागार, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, म्हसळा तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा फोटोग्राफर असोशियनचे सदस्य अश्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शासन्याच्या विविध योजना राबवून त्यांनी तालुका कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. ते समाजाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. या बाबींचा विचार करून त्यांना जीवन गौरव पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील गजानन चेऊलकर, शंकर कुंभार, राजाराम बिरवाडकर, रामदास साळवी, प्रविण शिरकर, नितीन राजपूरकर, मनोहर कुंभार, चंद्रकांत विन्हेरकर, यशवंत खांडपेकर, वसंत कोलाटकर, परशुराम गव्हाणकर आणि राजेंद्र कुडेकर यांनाही जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुनिल अंजर्लेकर यांना पुरस्कार
