सुनील भोईर यांचे निधन

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील विंधणे गावचे शेतकरी कुंटूबातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल बाळकृष्ण भोईर यांचे शुक्रवारी (दि.18) अल्पशा आजाराने वयाच्या 61 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी भूमीविषयक बागायती योजनेचे तसेच अन्य शेतकी योजना येथील शेतकर्‍यांना समजावून येथील आपल्या शेतकरी बांधवाना कसा फायदा होईल त्याकडे ते सातत्याने मार्गदर्शन करीत असायचे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून तिन्ही मुले उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या जाण्याने मनमिळावू शेतकरी मित्र गमावल्याने येथील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी (दि.20) त्यांच्या राहत्या घरी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा दशक्रियाविधी रविवारी (दि.27) नाशिक येथे करण्यात येणार आहे. तर दिवसकार्य मंगळवार दि. 29 मार्च रोजी राहात्या घरी होणार आहे.

Exit mobile version