। उरण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्षाचे रांजणपाडा-जासई येथील निष्ठावंत कार्यकर्ते आणि जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश नारायण मोकल यांचे रविवार (दि.10) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रांजणपाडा-जासई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत म्हणून जासई परिसरात ते परिचीत असून पक्षाच्या प्रत्येक लढ्यात ते सहभागी होत. जासई ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून ते काही काळ प्रभारी सरपंच म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहीत मुली, दोन भाऊ, चार बहिणी, जावई, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांचा होमविधी गुरूवारी (दि.15) राहत्या घरी रांजणपाडा येथे होणार आहे. दशक्रिया विधी मंगळवारी (दि.20) तसेच उत्तरकार्य शुक्रवारी (दि.23) राहत्या घरी होेणार आहे.