मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप
। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणाला नवं वळण लागलं असून यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. नवाब मलिक यांच्याकडून दररोज या प्रकरणातील नवनवे खुलासे केले जातात. आज भाजपच्या मोहित कंबोज यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशीसंबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी आधी एक फोटो दाखवला की किरण गोसावी हा आर्यन सोबत सेल्फी काढत आहे. त्यानंतर दुसरा फोटो दाखवला त्यामध्ये मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे आर्यनला एनसीबी कार्यालयात घेऊन जात आहेत. पण यामागे सुनील पाटील असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. सुनील पाटील हे गेल्या 20 वर्षांपासून याचे राष्ट्रवादीचे संबंध असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केलाय.