सुनील सोनानीस यांचा सेवापूर्ती सोहळा

| अलिबाग | प्रतिनिधी |

सार्वजनिक बांधकाम विभागातील (मंत्रालय) वरिष्ठ अभियंता सुनील बाळकृष्ण सोनानीस यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मंत्रालय, विस्तार इमारत येथे भव्य सेवापूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, विभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनानीस यांच्या कार्यकाळातील राजभवन, मंत्रालय, विधानभवन, रस्ते व विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांवरील योगदानाची चित्रफीत सादर करण्यात आली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोनानीस यांच्या प्रामाणिक, गुणवत्तापूर्ण विशेष प्रशंसा करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विभागाचे सचिव नागरगोजे साहेब यांनीही तक्रारमुक्त सेवेस विशेष प्रशंसा करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. समारोपाच्या भाषणात सोनानीस यांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासाचा आढावा घेत कुटुंबीय, आई-वडील व पत्नीच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तायक्वांडो क्षेत्रात त्यांनी 8,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास विविध सामाजिक, क्रीडा व विभागीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version