। पेझारी । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून खारेपाट विभागातील अनेकांना शेकाप नेत्यांनी नोकर्या मिळवून दिल्या. त्यामुळे त्यांचे संसार सुखाचे झाले. सेवानिवृत्तीनंतर अशा लोकांनी पदाधिकार्यांकडे पाठ फिरविणे योग्य नाही. माणूस म्हणून याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असे आवाहन माजी आमदार पंडित पाटील यांनी स.दा. पाटील यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यामध्ये केले.
कोएसो ना.ना. पाटील हायस्कूल पोयनाड येथील ज्येष्ठ शिक्षक सदानंद दामोदर पाटील 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती सन्मान सोहळा ना.ना. पाटील संकुलाच्या सुलभाकाकू सभागृहामध्ये माजी आ. पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी नंदा पाटील (कर्जत), संकुल प्रमुख के.के. फडतरे, सत्रप्रमुख एस.के. पाटील, व्ही.डी. पाटील, तृप्ती पिळवणकर, स.दा. पाटील यांचे कुटुंबीय, पत्नी सुविद्या, मुलगा अभिजीत, सून पूजा तसेच प्रदीप पाटील, प्रतिक्षा पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र म्हात्रे व प्रकाश गोलीपकर यांनी सादर केलेल्या इशस्तवनाने झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार बर्गे यांनी मानले. भावपूर्ण वातावरणात निरोपगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवेंद्र पाटील, अविनाश पाटील, निनाद पाटील, महानंदा ठाकूर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.