पालकमंत्र्यांनी दौरा करून भरपाई देण्याची मागणी
। बोर्लीपंचतंन । प्रतिनिधी ।
गेल्या तिन वर्षा पासुनअचानक कोकणात उठलेले चक्रीवादळ, कोरोनाचा प्रादुर्भाव, तौक्तेचक्री वादळ आणि तेव्हापासून हवामानात आजपर्यंत झालेला बदलामुळे शेतकरी आंबा बागायतदारांना बसलेला फटका बसल्याने आंबा बागायतदारांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील आंबा बागायतदारांनी आंबा मोहराचे संरक्षण व्हावे यासाठी सर्व प्रकारच्या फवारण्या करुनही 100 झाडांना पाच पेटी देखील उत्पन्न होणार नसल्याने खर्च देखील वसूल होणार नसल्याने बागायतदार आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
अवकाळी पाऊस, धुळीचे वादळ, दमट आणि उष्ण वातावरण यामुळे काही झाडांना आलेला मोहर, कैर्या गळुन पडत असल्याने मात्र आंबा पिक तुरळक प्रमाणात होईल अशी शक्यता बागायतदारांनी वर्तविली आहे. आंबा व्यवसायासाठी शेतकरी जिवतोड मेहनत घेत असतो परंतु निसर्गातील होणार्या बदलामुळे आंबा बागायतदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या विभागाची पाहणी करून नुकसन भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे.
गेल्या तीन वर्षापासुन आंबा बागायतदार आंब्याच्या उत्पना अभावी पूर्णपणे मोडकळीस आला असून यावेळी नैसर्गिक हवामान बदलल्याने हजार झाडांना 100 पेटी देखील उत्पादन होणार नाही. यामुळे बाजारात आंबा महागण्याची शक्यता नाकारता येत नाही. – कृष्णा धुमाळ, आंबा बागायतदार, श्रीवर्धन