कॉंग्रेसचे सुनिल तटकरे राष्ट्रवादीने पळवले त्याचे काय?” : बाळासाहेब थोरात

महाड | प्रतिनिधी |

महाड नगरपरिषदेच्या छ. शिवाजी महाराज प्रशासकीय भवनाचे आज उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे इ. नेते एकाच मंचावर उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे या नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी पहावयास मिळाली. खा.सुनील तटकरे त्यांच्या भाषणात म्हणाले की माझे पदाधिकारी आणि सहकारी हे काँग्रेस ने पळवले. यावर बाळासाहेब थोरात यांनी बोलताना, “तटकरे म्हणतात, आमचे हे या पक्षाने घेतले ते त्या पक्षाने घेतले, मात्र काँग्रेसचे सुनिल तटकरे राष्ट्रवादीने पळवले हे सांगायला ते विसरले…” असा टोला लगावला. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला

Exit mobile version