दुपारी उन्हाचा तडाखा, पहाटे वातावरणात गारवा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पाताळगंगा | वार्ताहर |

दिवसेंदिवस वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, दुपारी जरी उन्हाचे चटके बसत असले, तरीसुद्धा रात्री वातावरणात अचानकपणे बदल घडत असल्यामुळे पहाटे गारवा निर्माण होत असून, धुके पडत असल्याचे या अचानक बदलत्या ऋतूमध्ये अनेकांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. दुपारी कडक उन्हाचे चटके, सायंकाळी गारवा, पहाटे धुके निर्माण होत असल्यामुळे दोन्ही ऋतू जणू एकाच वेळी निर्माण झाल्याचा भास प्रत्येकाला जाणवत आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागत आहे.

Exit mobile version