| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबीर खांदा कॉलनी येथील आगरी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात दि. 31 मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरात अंधश्रद्धाविरोधी विचारांचा प्रसार व वैज्ञानिक दृष्टिकोनाची जडणघडण यावर विशेष भर देण्यात आला.
शिबिरात आरती नाईक, महेंद्र पाटेकर यांनी संवादक म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व, संघटनेची पंचसूत्री, बुवाबाजीविरोधातील लढा, वैज्ञानिक दृष्टिकोन, संघटनेची कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमास प्रियांका खेडेकर, मनोहर तांडेल, प्रा. राम गोसावी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा गोसावी यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी पनवेल शाखेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
पनवेलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606