सुपर वायझरने गोदरेज टायसन कंपनीला घातला साडे चार लाखांचा गंडा

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
गोदरेज टायसन फुडस लिमीटेड कंपनीच्या सुपरवायझरने कंपनीला कोणतंही पूर्व कल्पना न देता 2 हजार 7 कोंबडयांची पोल्ट्रीफाॅर्मवरून सुमंगळ व इतर ट्रेडर्सना 4 लाख 50 हजार 189 रूपयास विक्री करून कंपनीत अपहार केल्याची घटना घडली आहे.
गोदरेज टायसन फुडस लिमीटेड कंपनीचा सुपरवायझर हा मूळ तीसगाव, ता.रहाता, जि.अहमदनगर येथील असून नोकरीसाठी पेण विभागात वास्तव्यास होता. कंपनीने नियुक्त केलेल्या सुपरवायझर पदाचा व कंपनीने प्रदान केलेल्या कर्तव्य व जबाबदारीचा अप्रामाणिकपणे वापर करून पुर्व परवानगीशिवाय कंपनीला साडे चार लाखांचा गंडा घातला आहे.
कंपनीच्या सुपरवायझर विरोधात दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक/भऊड हे करीत आहेत.

Exit mobile version