| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
गेली अनेक दिवसांपासून मुरुडकरांना गढूळ पाणी पुरवठा होत आहे. शहरात ताप खोकला सर्दी अशे आजार वाढल्याने सुजाण मुरुडकरांनी नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला व निवेदन दिले. अलंकापुरी येथील फिल्ट्रेशन प्लांटला भेट दिली असता, गेली कित्येक महिने तो प्लांट बंद आहे, अशी माहिती नगरपालिका अधिकारी यांच्याकडून मिळाली. म्हणजे कित्येक महिने मुरुडकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. सुजाण मुरुडकरांनी आवाज उठवला म्हणून ही सद्यस्थिती लक्षात आली. आणि तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करून द्या असे निवेदन दिले.
सर्व मुरुडकारांना विनंती आहे कि, आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात जनआंदोलन केले पाहिजे; तरच प्रशासन काहीतरी ठोस उपाययोजना करेल. नाहीतर आपल्याला रोजच दूषित पाणी प्यावे लागेल. बाजारातील हितेंद्र पंड्या यांच्या परिसरातील लाईन चांगली असताना बदलण्यात आली. पूर्वी नगरसेवक होते त्यावेळी तक्रार येताच स्वतः नगरसेवक संदीप पाटील, बाबा दांडेकर, प्रमोद भायदे धावत असत; परंतु आज प्रशासन असल्यामुळे पाणीपुरवठा राम भरोसे झाली आहे. याकडे लक्ष कोण देणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांनी शेवटची संधी नगरपालिकेला दिली आहे, जर पाणीपुरोवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुरुडकरांना गढूळ पाणीपुरवठा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606