उपोषणकर्त्यांना पाठिंबा – अ‍ॅड. उमेश ठाकूर यांचे आश्‍वासन

। अलिबाग । वार्ताहर ।
18 महिन्यांचे शासकीय नियुक्ती आदेश मिळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अधिपरिचारीकांचे उपोषण सुरुच असून या आंदोलनाला काँग्रेस नेते उमेश ठाकूर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्यायग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी मी सदैव आपल्यासोबत असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. यावेळी संवाद साधताना शासन आणि प्रशासन यांच्या अन्यायकारी भूमिकेवर टीका केली. तसेच आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत, आपल्या प्रश्‍नासाठी आम्ही हरेक विधायक पाऊल उचलू या शब्दांमध्ये उमेश ठाकूर यांनी आपला पाठींबा दर्शविला आहे.

Exit mobile version