अलिबाग आगारात संपाला ‘आप’चा पाठिंबा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग आगारात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या सुरू असलेल्या संपाला आम आदमी पार्टीने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज आंदोलन स्थळी आपच्या वतीने दिलीप जोग, ऍड अजय उपाध्ये, आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना दिलीप जोग म्हणाले की, आजपर्यंत सर्वच सरकारांनी, पक्षांनी तुमचें आर्थिक शारीरिक मानसिकही शोषण केलें आहें तुम्हाला फक्त वापरून घेतले आहें आता त्यांचा डोळा. एसटीच्या प्रॉपर्टी व खाजगीकरण याकडे आहे. तुमचा अपुरा पगार, पेन्शन सोयीसुविधा , वैद्यकीय मदत, यांतील तुलनात्मक विषमता यांची नीटशी जाणीवच जनतेला नाहीं तुमचे निश्‍वास तुमच्यापाशीच राहतात, पण, आता विलीनीकरणाचा मुद्दा, अपुरा बेसिक.यावर संघटनानंशिवाय सगळ्यांनी एकत्र येण्याची भूमिका तुम्हांला निश्‍चितपण विजयाकडे नेईल असा विश्‍वास दिलीप जोग यांनी व्यक्त केला.

Exit mobile version