रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा

। उरण । प्रतिनिधी ।

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा उरण यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी प्रीतम म्हात्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रीतम म्हात्रे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा उरण अध्यक्ष पंकज सोनावळे यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा देऊन सर्व पदाधिकारी, पक्षाशी निगडित असलेल्या तमाम आंबेडकरी जनता आणि सर्वसामाजिक संस्थेच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी प्रीतम म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version