। उरण । प्रतिनिधी ।
उरण मतदार संघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना समाजवादी पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहे.
यावेळी समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल नाईक यांनी उरण विधानसभेचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला. तर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकनचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनीदेखील पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे पनवेल आणि उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढली आहे. तसेच, नागरिकांनी पनवेल आणि उरणमध्ये शेकापच्या उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन अनिल नाईक आणि महेश साळुंखे यांनी केले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.