। पनवेल । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्षप्रवेशाचा ओघ कायम असून खोपटा आणि कोली कोपर येथील कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. शेकापमध्ये वाढत्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांना धडकी भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि चेतन म्हात्रे यांनी पक्षात स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेकापमध्ये इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होत असल्याने शेकापला बळकटी येत आहे. यावेळी खोपटा येथील भाजपचे युवा नेतृत्व दिलीप ठाकूर, चंद्रकांत घरत यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. तर, शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रशांत पाटील, नवनाथ पाटील, गन्नाथ पाटील, विकी पाटील, विनोद पाटील यांनी, तर काँग्रेसचे रोहित पाटील, चंद्रकांत पाटील, शरद घरत यांनी शेकापमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सुरेश पाटील, रमाकांत पाटील, संदीप गावंड, अरुण पाटील, अजित म्हात्रे, हरेंद्र गावंड, संग्राम पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आला. तर, पारगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गोकुळ गोमू नाईक यांनी शेकापमध्ये प्रवेश करत प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला आहे.
यावेळी वासुदेव भोईर, संदीप नाईक, अमृत भोईर, महेंद्र नाईक, रॉकी नाईक, शरद भोईर आणि त्यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.