| म्हसळा | वार्ताहर |
महाराष्ट्र कास्ट्राइब शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे ज़िल्हा अध्यक्ष प्रा. विनयकुमार सोनवणे यांनी कोकण शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. ऑनलाईन ज़िल्हा मीटिंग मध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे ज़िल्हा कार्याध्यक्ष प्रा. भालेराव यांनी सांगितले. येत्या प्रचलित अनुदान धोरण आणि जुनी पेन्शन या साठी आ. बाळाराम पाटील यांनी प्रयत्न करावेत या अपेक्षेने विनाअट पाठिंबा देत आहोत. आणि रायगड ज़िल्ह्यात आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी बाळाराम पाटील यांना विजयी करतील हा विश्वास व्यक्त केला.