सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; निवडणूक आयोगाच्या निवडीसाठी समिती नेमणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आयुक्तांच्या निवडीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सध्या केवळ पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती नेमणुका करत होते. आता निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नेमणुकीसाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सरन्यायाधीश यांची समिती राष्ट्रपतींकडे शिफारस करणार आहे.

लोकशाही टिकण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची स्पष्टता राखली पाहिजे. अन्यथा कोणताही परिणाम होणार नाही. एक समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI असतील.

न्यायमूर्ती केएम जोसेफ
Exit mobile version