विज्ञान शाखेतून सुरज ठाकूर सर्वप्रथम

। नागोठणे । वार्ताहर ।

नागोठणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कै. बापुसाहेब देशपांडे विद्या संकुलातील कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान, वाणिज्य व कला या तिन्ही शाखेचा बारावीचा एकूण निकाल 91.85 टक्के इतका लागला. असून यावेळी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान वाणिज्य व कला या तिन्ही शाखा मिळून एकूण 307 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातून 282 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून सुरज ठाकूर हा विद्यार्थी 90.67 % गुण मिळवुन प्रथम आला आहे. तर, सार्थक म्हात्रे 86.50%, धनश्री पाटील 80.33% हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत निवेदन नाईक याने 71.17 टक्के गुण मिळवून प्रथम पटकाविला. तर, अमिषा ताडकर 65.67%, सुमित म्हात्रे63.59% हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. याचबरोबर कला शाखेतून भाग्यश्री ठाकूर ही विद्यार्थिनी 71.76 टक्के गुण प्राप्त करत प्रथम आली. तर, अंकिता अंभोरे 66.83% व प्रणय बडे 63.33% हे विद्यार्थी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

Exit mobile version