सुरेश लाड यांचे आत्मदहन आंदोलन स्थगित

24 जानेवारीपर्यंत अल्टीमेटम
खोपोली | वार्ताहर |
नंदनपाडा, गोहे आणि गोठीवली येथील साडेतीनशे एकर औद्योगिक कारणांसाठी घेतलेली जमीन न्यूमिलेनियम कंपनीने लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना विकल्याचा गंभीर आरोप करत माजी आमदार सुरेश लाड यांनी शेतकर्‍यांसोबत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र ते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
प्रशासनाने या प्रकरणात दि.3 जानेवारीला सुनावणी आयोजित केली असून प्रशासनाला वेळ देण्यासाठी तसेच नगरपंचायतीची अचारसंहिता असल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याची माहिती देत दि. 24 जानेवारीपर्यंत योग्य न्याय मिळाला नाही तर दि.25 जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा माजी आमदार सुरेश लाड यांनी देत कायदेशीर पुरावेनिशी गंभीर तक्रार करूनही प्रशासन ठप्प का ? याबाबत लाड यांनी शंका व्यक्त केली आहे.
सुरेश लाड यांनी शेतकर्‍यांसह आत्मदहन करण्याच्या इशारा दिला यावेळी हनुमंत पिंगळे, तालुकाध्यक्ष नरेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी या प्रकरणी 3 जानेवारीला सुनावणी आयोजित केल्याचे सांगत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले होते.
.3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी आयोजित केली असून सर्व कायदेशीर कागदपत्रे तपासून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली यांनी सांगत अत्मदहन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.

Exit mobile version