राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी सुरेश मगर

। खांब-रोहे । वार्ताहर ।
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, माजी आ.सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा कार्यकारणी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहे तालुक्याचे सुरेश मगर यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.

या बैठकीस राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदीती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, पक्ष निरीक्षक संजय वढावकर, जिल्हा कार्याध्यक्ष मधूकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, जेष्ठ नेते शिवराम शिंदे, भाई टक्के, अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, रोहा शहर अध्यक्ष अमित उकडे, व रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडी नंतर सूरेश मगर यांनी खा.सुनिल तटकरे यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवत पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे.हा विश्‍वास सार्थ करीत त्यांना अभिप्रेत असलेले व पालकमंत्री आदीती तटकरे तसेच आ.अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version