सुरेश रैनाने पाकिस्तानी पत्रकाराला झापल

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना न्यूयॉर्क येथे 9 जूनला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वीच आता सोशल मीडियावर सामना पाहायला मिळतोय. भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना याने ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आजच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली. युवराज सिंग व ख्रिस गेल यांच्यानंतर हा मान पटकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यावरून पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला रैनाने सडेतोड उत्तर दिले. रैनाने त्याला आपण 2011 चा वर्ल्ड कप जिंकला असल्याची पत्रकाराला आठवण करून दिली. त्याचवेळी मोहालीत पाकिस्तानचा केलेला पराभवही रैनाने पत्रकाराला आठवून दिला. 2011 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रैनाने 39 चेंडूंत महत्त्वाच्या 36 धावा केल्या होत्या. आफ्रिदी हा पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू होता.

Exit mobile version