| माणगाव | प्रतिनिधी |
महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या सचिव यशोधरा गोडबोले यांचे थोरले बंधू प्रज्ञा विकास बौध्दजन मंडळ माणगांवचे सभासद सुरेशचंद्र भगवानराव गवळे यांचे शनिवार, दि.14 डिसेंबर रोजी एमजीएम रुग्णालय, कळंबोली-पनवेल येथे औषोधोपचार सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सायं.7.10 वा. निधन झाले. मृत्यूसमयी ते 47 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, दोन बहिणी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गवळे, गोडबोले कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.15 डिसेंबर रोजी दु.2 वा. त्यांचे मूळगावी धनेगाव नांदेड येथे करण्यात आला. त्यावेळी अंत्यविधीला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. सुरेशचंद्र गवळे यांचा जलदान विधी बुधवार, दि. 18 डिसेंबर रोजी राहते घरी मूळगावी धनेगाव नांदेड येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.