सुरगड श्रमदान मोहीम उत्साहात

58 दुर्गवीरांचा उत्स्फूर्तपणे सहभाग

| खांब | प्रतिनिधी |

दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई आयोजित सुरगड संवर्धन श्रमदान मोहीम नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या मोहिमेसाठी रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पुणे, मुंबई व स्थानिक अशा 58 दुर्गवीरांनी सहभाग नोंदवला होता.

गडावरील दारुकोठार, राजसदार, टाकं व वेगवेगळी जोतींवरील वाढलेलं गवत काढून त्यांना उजेडात आणण्याचं काम सदर मोहिमेत करण्यात आले. तसेच गडाच्या पूर्वेला मातीखाली गाडलेलं एक नवीन पाण्याचं टाकं सापडल्यानं त्याचं गाळ, माती काढण्याचं काम करण्यात आले. या मोहिमेत 3 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत अशा सर्व वयोगटातील दुर्गवीर सहभागी झाले होते. सर्वांच ओळख सत्र करून गडसंवर्धनास सुरुवात केली. त्यानंतर गडसंवर्धनाचे महत्व पटवून आपली संस्कृती व इतिहास टिकवण्यासाठी अशा अनेक हातांची गरज आहे, असे आवाहन सर्वांना करण्यात आले. संपूर्ण गडफेरी करून मोहिमेचा शेवट करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान संस्था ही अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात अपरिचित असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचं काम करत आहेत.

रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ घेरासुरगड गावाजवळ असलेल्या सुरगडावर स्थानिक दुर्गवीर किशोर अर्जुन सावरकर, किरण गायकर आणि नेहा चव्हाण, अर्जून दळवी यांच्या नेतृत्वाखाली संवर्धनाचे कार्य करत आहेत. तर अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दुर्गवीर ठिकठिकाणी गडदुर्गांचे संवर्धन करत आहेत.

– किशोर सावरकर, स्थानिक दुर्गवीर

Exit mobile version