। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे उद्घाटन 2002 साली झाले. त्यानंतर तब्बल 12 वर्षानंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश मेथा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड आणि ग्रामिण रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यातून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात एकूण 22 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेश मेथा यांच्या संकल्पनेतून रुग्णालयात वर्षभरात अनेक उपक्रम आणि शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविल्या जातात. त्यामध्ये क्षयरोग निर्मूलन, कुपोषण निर्मूलन, रक्तदान शिबीर, विविध दुर्धर रोगांवर उपचार केले जातात.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीतेसाठी सर्जन डॉ. विजय गवळी, वर्षा गवळी, डॉ. महेश मेथा, डॉ. प्रशांत गायकवाड, अस्मिता तांबडे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, म्हसळा, मेंदडी, खामगांव, आंबेत आशा आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्यातून शिबीर यशस्वी झाले.