। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
तुर्भे विभागातील गोरगरीब नागरिक मागील एक वर्षांपासून पाणी टंचाईच्या त्रस्त असल्याने सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी धारकांनी पालिका अधिकारी मनोज पाटील यांना घेराव घालत शेकडो संतप्त नागरिकांनी तुर्भे परिसरातील जनतेला पुरेसे पाणी मिळत नाही याचा जाब विचारला.
यावेळी संतप्त नागरिकांना शांत करित स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी इशारा दिला की, गेल्या वर्षभरापासून तुर्भे स्टोअर आणि सभोवताली असणार्या सुमारे एक लाख नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई मनपा एमआयडीसीला महिना दोन कोटी रुपये देत असताना सुद्धा पाणी पुरवठा अपुरा होत होता त्यामुळे येथील नागरिक प्रचंड संतप्त होते. येत्या आठवड्यात तुर्भे विभागाला नियमित व पुरेसा पाणी पुरवठा न झाल्यास ठाणे-बेलापूर महामार्ग अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी प्रकाश पाटील, महेश कुलकर्णी, केशवलाल मोर्या, तय्याब पटेल, दिलीप जगताप, बाळकृष्ण खोपडे उपस्थित होते.