शेकापक्षाचा पाणी पुरवठा अधिकाऱ्याला घेराव
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
उन्हाळ्यात सोसाव्या लागलेल्या पाणी टंचाईची झळा पावसाळा सुरु होताच कमी होतील अशा अपेक्षेत असलेले कामोठेकर ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचा सामना करत असल्याने नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कामोठे शहरातील पाणी पुरवठा ऑफिसला घेराव घालण्यात आला. नागरिकांच्या होणारी फरफट अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर सध्या पुरेसा पाणीसाठी नवी मुंबई पालिकेच्या धरणात झाला असून लवकरच सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, प्रमोद भगत, कामोठे कार्यध्यक्ष गौरव पोरवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, लाल ब्रिगेड अध्यक्ष कुणाल भेंडे यांच्या सोबत चॅनल नेक्स्ट, साईप्रसाद, निधी निवास, गौरीहर कॉम्पलेक्स, सरिता सरगम, भक्त निवास, साई प्रेरणा, जुई आर्केड, मनीषा अपार्टमेंट आदी इमारतीमधील रहिवाशी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.