सर्व्हेक्षण समितीची कर्जत आगाराला भेट


| कर्जत | वार्ताहर |

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत सर्व्हेक्षण समितीने सोमवारी(दि. 15) कर्जत एस टी आगाराला भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सर्व्हेक्षण समिती कर्जत एस टी आगारामध्ये आली. त्यात कामगार अधिकारी विलास चौगुले, विभागीय अभयंता अक्षय केकरे, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता. वाहतुक निरिक्षक देवानंद मोरे, सहाय्यक वाहतुक निरिक्षक महादेव पालवे, वाहतुक नियंत्रक विलास बागुल, वरिष्ठ लिपिक अनुजा सुरावकर यांच्या समवेत संपूर्ण आगार परिसराची पाहणी केली. संपूर्ण आगार परिसरातील स्वच्छता, प्रवासी निवारा, कार्यालयातील कामामध्ये वेगळ्या प्रकारच्या मांडणी बद्दल समाधान व्यक्त केले. आगार व्यवस्थापकांचे निवास स्थान, उद्घोषणा तसेच इमारतींची दुरुस्ती याबाबत सूचना केल्या.

Exit mobile version