सुंदर गाव पुरस्कारासाठी सर्वेक्षण

| तळा | वार्ताहर |

स्वर्गीय आर.आर. पाटील स्वच्छता व सुंदर गाव पुरस्कार सर्वेक्षणासाठी पोलादपूर पंचायत समितीमधील सहाय्यक गटविकास अधिकारी चिमाजी हंबीर, सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता यांच्या कमिटीने तळे तालुक्यातील दुर्गम असणाऱ्या महागाव ग्रामपंचायतला भेट देत स्वच्छ व सुंदर गाव पुरस्कारासाठी सर्वेक्षण केले. यावेळी कमिटीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. मिळालेले पुरस्कार, शोषखड्डे, परिसर, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, गावातील आरोग्य, इत्यादीची पाहणी केली. यावेळी कानू पिंगळे, नितीन साळवी, नंदिनी कडव, वंदना कालेकर, मनीषा कापरे, विठोबा साबळे, संतोष आमले, प्रवीण घाटवळ, कांतीलाल कसबले, मनीषा निवाते, तुकाराम राणे, रोशन फराडे, अंगणवाडी सेविका, गंगाराम साळवी, कृष्णकांत मानकर, गंगाराम कोळी, यशवंत पिंगळे व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version