रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये तरूणी पडली होती बेशुद्ध
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत जवळ पुण्याकडे जाणार्‍या सिंहगड एक्स्प्रेसमधून एक तरुणी बेशुद्ध पडली होती. बेशुद्धावस्थेत स्थानकात उतरवण्यात आलेल्या त्या तरुणीचे कर्जत रेल्वे आरपीएफ आणि रेल्वे पोलीस यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण वाचले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर तरुणी सिंहगड एक्सप्रेसने पुणे ते कर्जत असा प्रवास करत असताना सिंहगड एक्सप्रेस सकाळी कर्जत रेल्वे स्थानकात पोहचली असता ती तरुणी बेशुद्धावस्थेत कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर उतरविले गेले आणि स्थानकात असलेल्या आसनावर बसली. सदर घटना आरपीएफ कार्यालयात कर्तव्यावर असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांना एका प्रवाशाने सांगितली. सदर सुचना मिळताच आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रसाद चौगले, आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबल मंजु विश्‍वकर्मा, जिआरपीच्या महिला कॉन्स्टेबल गावडे, कॉन्स्टेबल आशा तायडे ह्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेत असलेल्या तरुणीस कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयातील डॉक्टर चवरे यांनी लागलीच तरुणीवर उपचार करून तिचे प्राण वाचविले. सुमारे पाच तासानंतर बेशुद्ध असलेली तरुणी शुद्धीवर आली व तिने आपले नाव रोहिणी अशोक कटमनी राहणार बदलापूर असे सांगितले. सदर तरुणी सिंहगड एक्सप्रेसने चिंचवड ते कर्जत व नंतर कर्जत ते बदलापूर असा लोकलने प्रवास करणार होती. तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल वरून आरपीएफच्या अधिकार्‍यांनी तिची आई चन्नमा अशोक कटमनी ह्यांच्याशी संपर्क करुन घडलेली घटना रोहिणीच्या घरच्यांना कळवली. कर्जत रेल्वे आरपीएफ व जिआरपी ह्यांनी बेशुद्ध झालेल्या रोहिणीस वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून तिला सुखरूप घरी पोहचवल्यामुळे तिची आई चन्नमा अशोक कटमनी हिने कर्जत रेल्वे आरपीएफ व जिआरपी यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version