आगरी संस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत पाटील

| पेण | प्रतिनिधी |
अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सूर्यकांत पाटील यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. सन 2022 ते 2027 या पाच वर्षांकरिता ही निवड करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी डॉ. सिध्दार्थ पाटील (मुंबई,) नलिनी पाटील (ठाणे)तर कार्याध्यक्षपदी संजय ठाकूर (पेण) तसेच सरचिटणीसपदी धनाजी घरत (पेण), सहचिटणीसपदी अ‍ॅड. निलेश पाटील (पनवेल), नरेंद्र म्हात्रे (मुलुंड), खजिनदारपदी पांडुरंग पाटील (पेण), सहखजिनदारपदी रवींद्र म्हात्रे (पेण) तर कार्यकारणी सदस्य म्हणून जनार्दन माळी (इगतपुरी), कल्पना टेमकर (नागोठणे), गजानन म्हात्रे (नवी मुंबई), आल्हाद पाटील (पनवेल), संतोष पेरणे (कर्जत), राजेंद्र वाघ (अलिबाग) यांची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version