| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नीट पेपर फुटीविरोधात तरुणांनी दिल्लीच्या संसद भवनमध्ये दाद मागण्याचा प्रयत्न केला. हा लढा देशाच्या भविष्यासाठी, न्याय हक्कासाठी, आपले हक्क रोखण्याविरोधातील होता. मात्र, या सरकारने पोलीस बळाचा वापर करीत लाखो तरुणांवर अमानुषपणे लाठी हल्ला केला. ही घटना अतिशय निंदनीय आहे. तरुणांनो जागे, व्हा, रात्र वैऱ्याची आहे. संविधानावर आणि लोकशाहीवर घाला घालणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. देशाचा कारभार सुशिक्षितांनाच हाती घ्यावा लागणार आहे, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
यावेळी ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या की, नीट परीक्षा झाल्याशिवाय वैद्यकिय क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी पात्र ठरवता येत नाही. 1 लाख 763 जागांसाठी 25 लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. नीट पेपर फुटीमुळे आज 25 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. पेपर फुटीमळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वप्न भंगल्याची घणाघाती टीका ॲड. मानसी म्हात्रे यांनी यावेळी केली.







