सूर्यकुमार यादव ‘कम्प्लीट पॅकेज’

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
श्रीलंका संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने 38 धावांनी उत्कृष्ट विजय मिळवला. श्रीलंका दौर्‍यात सूर्यकुमार यादवचं आतापर्यंतचं प्रदर्शन अप्रतिम आहे. एकदिवसीय मालिकेपासून तो धावांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे त्याला थेट विराट आणि रोहितच्या पंगतीत बसवत तिन्ही क्रिकेट प्रकारातील ‘कम्प्लिट पॅकेज’ अशी उपमा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने दिली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने 34 चेंडूंत 50 धावा ठोकल्या. ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 शानदार षटकारांचा समावेश होता. यावेळी सूर्याचा स्ट्राइक रेट तब्बल 147.06 होता. सूर्याने आतापर्यंत भारतासाठी चार टी-20 सामन्यात 46.33 च्या सरासरीने 139 रन्स केले आहेत.

Exit mobile version