सुशीला पत्की यांचे निधन

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील जोगेश्‍वरी नगर (गावठाण) येथील रहिवासी सुशीला रामचंद्र पत्की (94) यांचे गुरुवार, 2 जून रोजी रात्री 9.30 वा. च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र पत्की यांच्या त्या पत्नी, तसेच पत्रकार मंगेश पत्की यांच्या त्या आजी होत. कै. सुशीला पत्की यांच्या पश्‍चात विजय व अजय ही दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. कै. सुशीला पत्की यांच्या पार्थिवावर शुक्रवार, 3 जून रोजी सकाळी 11 वा. येथील अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दशविधी शनिवार, दि. 11 जून रोजी श्री क्षेत्र उद्धर-पाली, तर उत्तरकार्य सोमवार, 13 जून रोजी त्यांच्या राहत्या घरी करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version