सुशीला पवार यांचे निधन

| माथेरान | वार्ताहर |

स्वातंत्र्यसैनिक धोंडू पवार यांच्या पत्नी व स्व. पत्रकार संतोष पवार व पत्रकार गिरीश पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने शुक्रवारी (दि.3) सकाळी 10.30 वाजता निधन झाले. निधनसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या.

सुशीला धोंडू पवार यांनी माथेरानमधील बी.जे. हॉस्पिटल येथे आयाचे काम केले होते. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना समाजकार्याची आवड निर्माण करून दिली. त्यानुसार त्यांच्या दोन्ही मुलांनी समाजकार्याचे व्रत घेऊन पत्रकारिता स्वीकारली. मराठा समाजामध्ये काम करत महिला सक्षमीकरणत सक्रिय होत्या. गेली चार वर्षांपासून त्यांना स्तनाच्या कर्करोगाने ग्रासले होते. कर्करोगाची झुंज अखेर संपली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी सोशल मीडियातून हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version