सुशीलकुमार शिंदे प्रचारात सक्रिय

| सोलापूर | प्रतिनिधी |

माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे वयाच्या ऐंशी वर्षातही तरुणांना लाजवेल असा प्रचार करत फिरत आहेत. लेकीला निवडून आणण्यासाठी वृद्ध सुशीलकुमार शिंदे दिवसरात्र एक करत आहेत. थकलेल्या आवाजात, वृद्ध वयात पायी-पायी चालत मतदारांना आवाहन करत आहेत. लेक प्रणिती शिंदेला दिल्लीत पाठवण्यासाठी थकलेले सुशीलकुमार वणवण भटकत आहेत. मंगळवारी गुढीपाडवा होता, यानिमित्त सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय पारंपरिक पेहराव घालून विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. सुशीलकुमार शिंदेनी मंगळवारी सांयकाळी पारंपरिक वेशभूषा धोतर-शर्ट परिधान करून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासोबत बैठक केली.

वयोमानानुसार, पार थकून गेलेले वृद्ध माजी मुख्यमंत्री भाषण देखील हळू आवाजात करत होते. लेकीसाठी दिवसरात्र एक केलेले सुशीलकुमार शिंदे यांचा घसा देखील बसला होता. शिंदेना धोतर बाबत विचारताच त्यांनी हसत हसत उत्तर दिलं, गुढीपाडवा आहे, म्हणून पारंपरिक वेशभूषा परिधान केली, ही लुंगी नाही तर धोतर आहे आणि धोतरमधून काहीही संदेश देण्याचा प्रयत्न माझा नाही, असंही ते म्हणाले.

वृद्ध माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी 2022 मध्ये जाहीरपणे सांगत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उतरणार नाही, अशी घोषणा केली होती. वयाचे कारण देत शिंदेनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. लोकसभेच्या दंगलमधून बाहेर पडताच त्यांची कन्या प्रणिती शिंदे लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. वृद्ध आणि थकलेले सुशीलकुमार शिंदे वयाचं कारण देत, राजकारणातून जरी निवृत्त झाले असले, तरी त्यांना लेकीसाठी प्रचारात फिरावे लागत आहे. शिंदेना भर भर चालायला येत नाही तरी देखील पायी चालत लेकीसाठी प्रचारात दिसत आहे.

Exit mobile version