प्राणघातक हल्ला करणार्‍यास अटक

| पनवेल | वार्ताहर |
कामोठे वसाहतीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम यांच्यावर चोरट्याने प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने समयसूचकता दाखवत जखमी झाले असतानाही चोरट्यास पकडून ठेवले व परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला कामोठे पोलिसांच्या हवाली केले.

प्रशांत कदम हे कामोठे वसाहतीमधील त्यांच्या ऑफिसमधील काम संपल्यानंतर घरी जाताना पैसे काढण्यासाठी ते एका खासगी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी या एटीएममध्ये अन्य एक अनोळखी व्यक्ती उभा होता. याच वेळी कदम यांच्या पाठमागून येऊन त्या अज्ञात इसमाने कदम यांच्या डोक्यावर जोरदार वस्तूने हल्ला केला. यावेळी कदम यांनी स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्न केला मात्र, त्या अज्ञात इसमाने त्यांना मारहाण सुरू करून, त्यांच्या जवळच्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न करताच जखमी अवस्थेतही त्याला पकडून ठेवले. यावेळी परिसरातील नागरिक कदम यांच्या मदतीला धावून आले आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Exit mobile version