| पनवेल | वार्ताहर |
अज्ञात इसमाने एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून तिच्या खात्यातून 40 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल्याची घटना घडली आहे.
सुनिता बोरकर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, त्या कामोठे सेक्टर 9 येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असताना त्याचवेळी एका भामट्याने त्यांना पैसे काढून देण्याचा बहाणा करत एटीएम कार्डची अदलाबदल हातचलाखीने केली व त्यानंतर पैसे निघत नसल्याचा बहाणा केला. याच दरम्यान त्याने महिलेच्या एटीएमच्या आधारे 40 हजार रुपये रोख काढून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.