| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील रेल्वे कॉलनी तक्का येथून मोटार सायकल चोरणार्यास विष्णू नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. जयसिंग मिणा यांची काळ्या रंगाची टीव्हीएस मोटार सायकल रेल्वे कॉलनी तक्का येथून चोरीस गेली होती. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल मानकर यांनी अधिक तपासामध्ये आरोपी अनिल गोरे (25) याला विष्णूनगर परिसरातून ताब्यात घेतले असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.