| पनवेल | प्रतिनिधी |
थार गाडीने एटिंगा कारला दिलेल्या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताप्रकरणी थार गाडीवरील वाहन चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. थार वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवले आणि मंजीत लालजी कुरमे रा. सेक्टर आर दोन, करंजाडे यांच्या एरर्टिगा कार या गाडीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. हा अपघात जुना पुणे-मुंबई रोडवर, मॅरेथॉन बिल्डिंगजवळ झाला. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.






