| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा नावडे फेस टू येथे केलेल्या घरफोडीत चोरांनी दोन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार प्रदीप सोनवणे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून चोरांनी आत प्रवेश केला आणि मंगळसूत्र, सोन्याचा नेकलेस, अंगठ्या, ब्रेसलेट, झुमके आणि रोख रक्कम चोरून नेली.





