| पनवेल | वार्ताहर |
फोनवरुन संपर्क साधून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार पनवेल परिसरात जोरदार सुरू आहेत. खारघरमध्ये अशाच एका प्रकरणात लग्न करण्याचे आमिष दाखवून 50 वर्षीय व्यक्तीला ऑनलाइन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याची 30 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
खारघर पोलीस ठाण्यात एका 50 वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की संबंधित तरुणीने तिचे नाव गायत्री असे सांगितले. तिने फेसबुकवरुन त्यांच्याशी ओळख केली होती. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून लग्नाचे आमिष दाखवून तिने त्यांचा विश्वास संपादन केला. नंतर त्यांना अन्झो कॅपिटल या कंपनीतील ट्रेड घेण्यास भाग पाडण्यात आले. सहाय्यक पोलीस निरिक्षक मिलिंद फडतरे हे फसवणूक करणार्या महिलेचा शोध घेत आहेत.